Mumbai Vada Pav : मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील 50 सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापावला स्थान मिळालं आहे. मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे. टेस्ट ॲटलसच्या जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीमध्ये मुंबईच्या वडापावने स्थान मिळवलं आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मुंबईच्या वडापावला तेरावं स्थान मिळालं आहे. या यादीत तुर्कीचं टॉम्बिक सँडविच पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पेरुचं बुटीफारा सँडविच आणि अर्जेंटिनाचा डी लोमो सँडविचचा तिसरा क्रमांक आहे.