Gudi Padwa 2022 : आज गुढी पाडवा. आजपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते.

आजच्या या शुभ सकाळी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाच्या वर कळसावर गुढी उभारण्यात आली आहे.

तुळजाभवानी मंदिरात कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर भाविक आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत गुढी पाडवा साजरा होत आहे.

देवीच्या मूर्तीला सर्वोत्कृष्ट दागिन्यांचा पेहराव देखील करण्यात आला आहे.

मंदिरात पारंपरिक पद्धतीनं, विविध कार्यक्रमांनी गुढीपाडवा साजरा होतो.

मंदिराच्या स्थापनेपासून यंदा पुजारी, भाविकांविना हा सोहळा भल्या पहाटे साजरा करतात.

तुळजाभवानी कळसावरच्या गुढीनंतर तुळजापुरात गुढी उभारली जाते.

परंपरेप्रमाणे आज पहाटे अभिषेक झाला. देवीला महावस्त्राचा पेहराव करण्यात आला. दागिने घालण्यात आले. देवीसमोर खडाव ठेवण्यात आले. त्यानंतर महंतांच्या उपस्थितीत गुढी उभी करण्यात आली आहे.