26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी तसेच संपूर्ण देशासाठी काळा दिवस ठरला होता.

समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला.

आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत.

या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे.

26/11 हल्ल्यातील वीर शहिदांना अभिवादन

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून मुंबई हल्ल्यावेळी शहराचे रक्षण व नागरिकांचे जीव वाचण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून मागील 5 वर्षांपासून 26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.