बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या सिनेमांपेक्षा विविध अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधिक चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या घोषणेनंतर कंगना रनौतने शीख समुदयाला खलिस्तानी आंतकवादी म्हणत एक वादग्रस्त पोस्ट केली होती.

कंगनाचं ट्विटर अकाउंट याआधीच हटवण्यात आलं असलं तरी तिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती.

ज्यानंतर तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली असून आता तिला थेट विधानसभेने समन्स बजावलं आहे.

आमदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या नेतृत्वाखाली समितीने कंगनाच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता तिला हजर राहण्यास सांगतिले आहे.

चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली शांती आणि सद्भाव संबंधी समितीने कंगनाला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.