रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर रहा. असे नेहमीच म्हटले जाते. लाल आणि हिरव्या सफरचंदांमध्ये नेमका काय फरक? याबाबत कधी विचार केला आहे का? आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिरवे सफरचंद चवीला आंबट असतात आणि त्यांची साल जाड असते. लाल सफरचंद गोड-रसरशीत आणि पातळ सालीची असतात. हिरव्या सफरचंदांमध्ये लाल सफरचंदांपेक्षा जास्त फायबर असते. त्यात कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाणही लाल सफरचंदापेक्षा कमी असते. लाल सफरचंदात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. दोन्ही सफरचंदांच्या पोषणात थोडासा फरक असल्याने दोन्ही सफरचंद शरीरासाठी आरोग्यदायी आहेत. हिरव्या सफरचंदात व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे दृष्टी वाढते, मुरुमांचा धोका कमी होतो