पावसाळ्यात स्वयंपाकघरामध्ये दमट वातावरण निर्माण होतं.



त्यामुळे अनेक गोष्टी खराब होण्यास सुरुवात होते.



स्वयंपाकघरात ठेवलेले ड्रायफ्रुट्सदेखील यासाठी अपवाद नाहीत.



अशावेळी जर तुम्ही ड्रायफ्रुट्स योग्य पद्धतीने स्टोअर केले तर लवकर खराब होण्याची शक्यता कमी असते.



ड्रायफ्रुट्स हे नेहमी हवाबंद डब्यात ठेवावेत. त्यामुळे त्यामध्ये ओलावा निर्माण होण्याची शक्यता कमी असते.



अनेकजण हे ड्रायफ्रुट्स स्वयंपाकघरामध्ये मसाल्यांसोबत ठेवतात.



पण असं करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे ड्रायफ्रुट्स खऱाब होण्याची शक्यता जास्त असते.



ड्रायफ्रुट्स हे फ्रिजममध्ये ठेवणं योग्य ठरु शकतं.



त्यामुळे ते जास्त काळ फ्रेश राहण्यास मदत होते.



ड्रायफ्रुट्स रोस्ट करुन ठेवल्यास ते जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत होते.