महाराष्ट्रात महागाईचा (Inflation) भडका उडाला



किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या ज्वारीने पन्नाशी ओलांडली आहे.



त्यामुळे सर्वसामान्यांचं किचनचं बजेट बिघडलं आहे



यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं बाजारात धान्याची आवक कमी झालीय.



परिणामी धान्याचे दर वाढले आहेत.



सासवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजारात ज्वारीला 5301 रुपये इतका दर मिळाला



तर याच बाजारात जुलै महिन्यात ज्वारीला 6311 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला



यंदा पाऊस कमी असल्यानं शेतकरी धान्य बाजारात आणत नाही



त्यामुळे धान्याचे दर वाढल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप यांचं म्हणणंय.



मागच्या वर्षीच्या तुलनेत ज्वारीचे दर साधारणता सातशे ते एक हजार रुपयांनी वाढले