लंडनमध्ये ऑल इंग्लंड ओपन अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या विम्बल्डन 2022 या टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील उपांत्य फेरीत सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचनं विजय मिळवलाय.
या सामन्यात जोकोविचनं इटलीच्या यानिक सिनरचा (Jannik Sinner) पराभव केला.
या विजयासह जोकोविचनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. तसेच विम्बल्डन स्पर्धेत सलग 26 वा सामना जिंकण्याचा त्यानं पराक्रम केलाय.
जोकोविचनं विम्बल्डन स्पर्धेत 2006 मध्ये अखेरचा सामना गमावला होता. तेव्हापासून त्याला एकदाही पराभव स्वीकारावा लागला नाही.
जोकोविचनं विम्बल्डन स्पर्धेत 2006 मध्ये अखेरचा सामना गमावला होता. तेव्हापासून त्याला एकदाही पराभव स्वीकारावा लागला नाही.
3 तास 35 मिनिटे चाललेल्या या सामन्यात यानिक सिन्नरनं चमकदार कामगिरी करत दोन्ही सेट आपल्या नावावर केलं.
मात्र, त्यानंतर जोरदार कमबॅक करत जोकोविचनं सिनरचा 5-7, 2-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला.
नोवाक जोकोविचनं 41 वेळा विम्बल्डनची उपांत्य फेरीत धडक दिलीय.
विम्बल्डन स्पर्धेत नोवाक जोकोविचनं आतापर्यंत 84 सामने जिंकले आहेत.
या विजयासह त्यानं जिमी कॉनर्सच्या विक्रमाशी बरोबरी केलीय.