भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी केलेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावर देशांतर्गत इंधन दर ठरवले जातात.

आज कच्च्या तेलाच्या दरांत वाढ होऊनही देशातील दर मात्र स्थिरच आहेत

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा मोठा बदल 21 मे 2022 रोजी झाला होता.

केंद्र सरकारनं त्यावेळी पेट्रोल-डिझेलचे उत्पादन शुल्क 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरनं कमी केले होते.

तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फारसा बदल झालेला नाही.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

पुण्यात एक लिटर पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.36 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत मिळतंय. एक लिटर पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे.