ऑनलाइन जेवण ऑर्डर करताना बिर्याणी ही भारतीयांची पहिली पसंती आहे. मुंबईतील तरुणीने दारुच्या नशेत थेट बंगळुरुहून 2500 रुपयांची बिर्याणी मागवली. ही ऑर्डर झोमॅटो अॅपवरुन देण्यात आली. मुंबईतून दिलेली बंगळुरुतील ही ऑर्डर झोमॅटोने डिलिव्हर केली. ऑर्डर मिळाल्यानंतर मात्र हा सगळा प्रकार त्या तरुणीच्या लक्षात आला. त्यानंतर तिने आपल्या ऑर्डरचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो ट्विटरवर शेअर केला. मी बंगळुरुहून 2500 रुपयांची बिर्याणी मागवली होती का? असं ती म्हणाली. 21 जानेवारी रोजच्या या ट्वीटवर लाखो कमेंट्स आल्या. तुम्हाला हँगओव्हरचा आनंदी अनुभव मिळेल असा झोमॅटोने रिप्लाय दिला. आम्हाला या अनुभवाबद्दल नक्की कळवा असंही झोमॅटोने म्हटलं.