गरम पाण्यात तुरटी पावडर टाकून त्या पाण्यात पाय बुडवून बसा. कोथिंबिरीची पेस्ट सूज आलेल्या भागावर थो़डा वेळ लावून ठेवा. पायाची सूज कमी करण्यासाठी लिंबाचा रस रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये थोडे खोबरेल तेल घालून त्यांची पेस्ट सूज आलेल्या पायाला लावा,त्यामुळे लवकर आराम मिळेल. मोहरीच्या तेलाने पायाला मालिश करा. गरम पाण्यात सैंधव मीठ टाकून त्या पाण्यात पाय बुडवून बसा. बर्फाचे क्यूब कापड्यात गुंडाळून पायाला बर्फाचा शेक द्या. गरम पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर घाला आणि त्या पाण्यात पाय बुडवून बसा. तांदळाच्या पाण्यामध्ये बेकिंग सोडा घाला आणि पाण्यात पाय बुडवून बसा, त्यामुळे पायाची सूज कमी होणार. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.