माजी मिस यूएसए चेस्ली क्रिस्ट हिने मॅनहॅटनमध्ये आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले आहे. क्रिस्टने 60 मजली ओरियन इमारतीवरून उडी मारल्याचे सांगितले जात आहे.
याच इमारतीच्या नवव्या मजल्यावर तिचे अपार्टमेंट होते. इमारतीच्या 29व्या मजल्यावरील टेरेसवर तिला अखेरचे पाहिले गेले होते.
चेस्ली क्रिस्टने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक संदेश पोस्ट केला होता. तिने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘May this day bring you rest and peace’.
30 वर्षीय चेस्लीला तिच्या कामासाठी त्याला दोन वेळा एमी नामांकन मिळाले होते. क्रिस्ट ही वकील देखील होती.
तिने अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्यास मदत केली होती. तिला दोन विद्यापीठातून तीन पदव्या देखील मिळाल्या होत्या.
नॉर्थ कॅरोलिना येथील रहिवासी असलेल्या, क्रिस्टने एका लॉ फर्मसाठी दिवाणी खटल्याचा सराव केला आणि ज्या कैद्यांना अन्यायकारक शिक्षा झाली असेल, त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. (All PC : Twitter)