दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. टॉलिवूडपासून ते बॉलीवूडपर्यंत सर्वत्र पुष्पा सिनेमाची चर्चा सुरू आहे. अल्लू अर्जुन 16 दिवसांनंतर दुबई दौरा संपवून भारतात त्याच्या घरी परतला आहे. घरी पोहोचल्यावर त्याची लेक अरहानेचं त्याचं हटके स्वागत केलं आहे. अल्लू अर्जन नेहमीच मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अल्लू अर्जुनची मुलगी अरहा दिसत आहे. तिनं फुलांचा वापर करुन जमिनीवर 'वेलकम नाना' असा खास संदेश लिहिला आहे.