बॉलिवूडमधील तसेच छोट्या पडद्यावरील काही अभिनेत्रींने त्यांचे कास्टिंग काउचबद्दलचे अनुभव लोकांसोबत शेअर केले. नुकतीच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने (Divyanka Tripathi) देखील कास्टिंग काऊचबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती दिली. दिव्यांकानं सांगितलं की तिने 'कास्टिंग काउच' चा सामना केला आहे. तिला इंडस्ट्रीबद्दल जास्त माहिती न्हवती. तसेच अनेक लोकांनी तिचे करिअर खराब करण्याची देखील तिला धमकी दिली होती, असं तिने सांगितलं. दिव्यांका पुढे म्हणली, आई-वडील आणि बहिणीमुळे तिला बरोबर आणि वाईट यांमधील फरक समजला. 'करिअरच्या सुरूवातीला मला कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडतं होते त्यामुळे मी पार्टी तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जायला टाळत होते.', मला माहित होतं की मला माझ्यात असणाऱ्या टॅलेंटमुळे काम मिळालं. त्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त विचार केला नाही. '