तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार कराल तेव्हा प्रथम त्या ठिकाणची माहिती मिळवणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान, तुम्ही मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, तिकीट, इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे तुमच्यासोबत ठेवावीत. स्वत:चे दोन फोटो देखील सोबत ठेवावेत. तुम्ही एकटे जात असाल, तर वेळोवेळी तुमचे लोकेशन शेअर करत राहावा. प्रवासादरम्यान तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने औषधे सोबत ठेवा. पोटदुखी, लूज मोशन, गॅस, पेन किलर, ताप इत्यादीसाठी औषधे सोबत ठेवा. बहुतेक व्यवहार आता कॅशलेस झाले असले तरी तरीही तुमच्याकडे रोख रक्कम ठेवा. रोख रक्कमेचा वापर तुम्ही स्थानिक बाजारात किंवा लहान वस्तू खरेदी करण्यासाठी करु शकता. दिवसाच्या वेळी स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करा. रात्रीपेक्षा दिवसा पोहोचणे सुरक्षित आहे. मनमोकळे वागणे खूप चांगले आहे. मात्र एकटे फिरायला गेले असाल तर अनोळखीलोकांशी संवाद साधू नये.