दिवाळीला रंगांचा वापर करुन रांगोळी काढायला अनेकांना वेळ नसतो. त्यामुळे फुलांच्या पाकळ्यांचा आणि पानांचा वापर करुन तुम्ही रांगोळी काढू शकता. वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर करुन तुम्ही रांगोळ्या तुम्ही काढू शकता. झेंडूच्या फुलांचा आणि गुलाबांच्या पाकळ्यांचा वापर करुन तुम्ही ही रांगोळी काढू शकता. यामध्ये तुम्ही वॉटर पॉटचा वापर करु शकता. दिवाळीला ही सोप्या डिझाइनची रांगोळी तुम्ही काढू शकता. या रांगोळीसाठी तुम्ही पांढऱ्या, लाल आणि जांभळ्या रंगाच्या फुलांचा वापर करु शकता. झेंडूच्या फुलांच्या माळांनी तयार केलेली ही रांगोळी झटपट काढून होते. आंबांची पाने, गुलाबाच्या पाकळ्या आणि झेंडूची फुलं यांचा वापर करुन तुम्ही अशा सिंपल डिझाइनची रांगोळी काढू शकता. घरासमोर स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते. फुलांपासून काढलेली स्वस्तिकची डिइझान झटपट काढून होते. रांगोळीच्या मध्यभागी दिवा लावून त्याच्या बाजूनं फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी तुम्ही काढू शकता. मध्यभागी कलश ठेवून देखील तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता. फुलांच्या रांगोळीसाठी तुम्ही गुलाब, झेंडू आणि इतर काही फुलांचा देखील वापर करु शकता.