शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं.
केसरकरांच्या या वक्तव्याला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलंय.
आम्हाला नाही, तर शिंदे गटालाच आत्मपरीक्षणाची गरज असून, शिंदे गटातील अर्धे आमदार भाजपात जातील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
संजय राऊत म्हणाले, आत्मपरीक्षण कोणी करायचं हे ज्याचं त्यानं ठरवावे.
गद्दारांनी आम्हाला आत्मपरीक्षणाबद्दल सांगू नये. आम्हाला आत्मपरीक्षणाची अजिबात गरज नाही.
खरं तर त्यांनाच आत्मपरीक्षणाची गरज आहे. अब्दुल सत्तारांनी देखील माझ्याच पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट आहे
असा आरोप केला आहे. त्यामुळे केसरकरांनी आणि त्यांच्या गटानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
शिंदे गटात सुरू असलेली धूसफूस समोर येत आहे. शिंदे गटात देखील अजून गट पडले आहेत.
त्यामुळे हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही.