मुंबईत ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनादरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

मुंबईतील मराठी माणूस बाहेर जाता कामा नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

इंजिनिअरिंगसह सर्व शिक्षण मराठीतून करणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात पुढे होता. आता त्याला आणखी पुढे आणण्याचा प्रयत्न येत्या काळात करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सर्व क्षेत्रातील मंडळी विश्व मराठी संमेलनाला उपस्थित होते.

विश्व मराठी संमेलनाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते.

मराठी माणूस जगभरात आहे ही आनंदाची बाब आहे. मुंबईतला मराठी टक्का घसरू देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आज मुंबईत विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.