मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी पिचाई यांच्याविरोधात कॉपी राईटच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी न्यायालयात तक्रार केली होती. सुनील दर्शन यांनी बनवलेला चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर कोर्टाने मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. याच आदेशानंतर एमआयडीसी पोलिसांनी पिचाई यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी पिचाई यांच्याविरोधात कॉपी राईटच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.