अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'फायटर'.. फायटर हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फायटर या चित्रपटाचे 'हीर अस्मानी' थीम साँग प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सिद्धार्थ आनंद यांनी फायटर दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांवर आधारित आहे. या चित्रपटात हृतिक हा स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया ही भूमिका साकारणार आहे. दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ मिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. अनिल कपूर हे या चित्रपटात कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. फायटर या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिक आणि हृतिक पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.