पक्ष्यांना दाणा-पाणी दिल्याने जीवनातील अनेक समस्या कमी होतात, असा समज आहे.

अस म्हटले जाते की पक्ष्यांना अन्न दिल्याने एकीकडे देवाची भक्ती होते.

दुसरीकडे आपले आरोग्य चांगलं राहते आणि पुण्य मिळते.

कबूतर शांतीचे प्रतीक आहे, त्यामुळे त्याला अन्न दिल्याने आयुष्यात शांती टिकून राहते असा समज आहे.

असा समज आहे की जनावरांना ज्वारी खाऊ घातल्याने शुक्र ग्रहाची समस्या सुटते.

दररोज पक्ष्यांना दाणा टाकल्याने आर्थिक लाभ होतात असे म्हणतात.

कुंडलीत राहू-केतूची समस्या असल्यास पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावी असा समज आहे.

माशांना कणीक खाऊ घातल्याने संपत्तीची समस्या दूर होते, असा समज आहे.

कावळा आणि कुत्र्यांना अन्न दिल्यामुळे शनी,राहू, केतू प्रसन्न होतात असे म्हटले जाते.

असा समज आहे की खारु ताईला बाजरी,पोळी खाऊ घातल्याने जीवनात येणारी संकटे दूर होतात.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.