तुम्ही फ्रेश स्ट्रॉबेरी खा, कोल्ड कॉफी प्या, वॅनिला आईस्क्रीम खा किंवा अगदी साधं दूध प्या या सगळ्यात किंचित चॉकलेट घातलं तर त्या पदार्थाची चव जास्त वाढते.



आज जागतिक चॉकलेट दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी डार्क चॉकलेटचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत.



चांगल्या क्वालिटीचे डार्क चॉकलेट तसेच त्याबरोबर उच्च कोको सामग्रीसह बनवलेले चॉकलेट चवीलाही छान लागते. यामधून तुम्हाला न्यूट्रिशन मिळते.



डार्क चॉकलेट्समध्ये नैसर्गिक सेंद्रिय संयुगे (Organic Compounds)आढळतात. जे अॅंटिऑक्सिडेंट्सचे कार्य करतात.



डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुमच्या हृदयाशी संबंधित अनेक समस्या कमी होतात.



जर तुम्हाला डायबिटीस, हार्टचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही डार्क चॉकलेट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खा.



डार्क चॉकलेट तुमच्या स्किनसाठीसुद्धा फायदेशीर ठरते.



यामुळे सूर्याच्या उष्णतेपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण होते. चेहऱ्यावरील रक्तपातळी वाढते.