मुलांच्या आहारात साखरेचे सेवन जास्त प्रमाणात तर होत नाही ना याबाबत एक पालक म्हणून सतर्क असणे गरजेचे आहे.
सणासुदीच्या काळात मुलांच्या आहारात गोड पदार्थांचे सेवन वाढते, यावर पालकांचे लक्ष असणे आवश्यक आहे.
डॉक्टर नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या साखरेचे सेवन टाळता अतिरिक्त साखरेचे सेवन बंद करण्याचा सल्ला देतात.
एखादा पदार्थ तयार करताना, त्यावर प्रक्रिया करताना त्यात साखरेचा वापर करणे म्हणजेच अतिरिक्त साखर.
यामध्ये मध, मॅपल सिरप आणि फळांचा रस यासारख्या आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करणे योग्य राहिल.
दोन वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांनी दररोज 25 ग्रॅमपेक्षा कमी साखरेचे सेवन केले पाहिजे.
दररोज सहा टेबलस्पून पेक्षा कमी साखरेचे सेवन करावे. दोन वर्षाखालील मुलांना मात्र अतिरिक्त साखर देऊ नये.
फळे आणि भाज्या यांसारख्या पदार्थांमध्ये देखील साखर असते.
मात्र तज्ज्ञ आपल्याला 'अॅडेड शुगर' कमी करण्याचा सल्ला देतात. ज्यामध्ये कृत्रिम साखरेचा समावेश असतो.
तुम्ही तुमच्या मुलांना काय खायला देताय याकडे लक्ष द्या.
चिंता करु नका किंवा घाबरुन जाऊन साखरचे सेवन पूर्णतः बंद करु नका.
खाण्याच्या बाबतीत तुम्ही तुमच्या मुलाशी कसे वागता यावर या त्याचा परिणाम होऊ शकतो याची जाणीव ठेवा.