आयपीएल गाजवलेल्या दिनेश कार्तिकला भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्याने यंदा आरसीबीकडून दमदार फलंदाजी केल्याने त्यांची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. पण गौतम गंभीरने आता दिनेशच्या जागी दीपक हुडाला संधी द्या असं वक्तव्य केलं आहे. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदल होऊ शकतात. याबद्दलच बोलताना गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली. त्याने दिनेशच्या जागी दीपक हुडाला संधी देण्याचा सल्ला दिला. तसंच युवा फिरकीपटू रवी बिश्नोईला ही संधी दिली जाऊ शकते, असंही तो म्हणाला. पहिल्या सामन्यातही कार्तिकला केवळ दोन चेंडू खेळायला मिळाले, ज्यात त्याने एक धाव केली आहे. ज्यामुळे त्याला आणखी संधी मिळल्यास तो स्वत:ला सिद्ध करु शकतो. कार्तिकने चांगली कामगिरी केल्यास त्याला विश्वचषक खेळण्याची संधी देखील मिळू शकते.