सई ही लोकप्रिय निर्माते, दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. सईचा जन्म 23 डिसेंबर 1998 रोजी मुंबईत झाला. तिने 2019 मध्ये 'दबंग - 3' या सिनेमामधून बॉलीवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तिने तिचं पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापिठातून पूर्ण केलं आहे. सईने बॉलीवूड सोबत तेलगू चित्रपटसृष्टीत देखील काम केलं आहे. सईला तिच्या बॉलीवूडच्या पदार्पणासाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण म्हणून फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले आहे. सईने बाल कलाकार म्हणून महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श या चित्रपटात देखील काम केलं आहे. तिने काकस्पर्श चित्रपटापासून तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. सई सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टीव्ह आहे. तिचे फोटो हे चाहत्यांना कायम भुरळ घालतात.