अभिनेत्री योगिता चव्हाण ही कलर्स मराठी वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
तिने अंतरा ही भूमिका साकारली होती.
योगिताची ही भूमिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरली होती.
तिच्या या भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घरांघरात पोहचली.
आता तिने बिग बॉसच्या घरात ग्रँड एन्ट्री केली आहे.
योगिताने पुन्हा एकदा कलर्स मराठी वाहिनीवर योगिताने एन्ट्री घेतली आहे.
काही दिवसांपूर्वीच योगिताने तिचा सहकलाकार सौरभ चौघुलेसोबत लग्नगाठ बांधली होती.
योगिता आणि सौरभ यांचा विवाहसोहळ 3 मार्च रोजी पार पडला.
आता ती बिग बॉसच्या घरात कसा खेळ खेळणार याकडेही सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
तिचा खेळ पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.