बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पादुकोणने नुकतीच तिचे सेल्फी फोटो पोस्ट केले आहेत.
दीपिका पदुकोण म्हणते की ती सेल्फी पर्सन नाहीये.
पण, आपण जुलै महिना पूर्णपणे स्किन केअरसाठी देणार असल्याचं दीपिकाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलंय.
यामध्ये दीपिकाने तिचे स्किन केअर रुटीन शेअर केलं आहे.
दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये तिच्या फॅन्सबरोबर अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
ती तिच्या स्किन केअरसाठी कोणते प्रोडक्ट्स वापरते हे तिने सांगितलंय.
यामध्ये दीपिकाने तिचा स्वत:चा ब्रॅंड 82e वापरत असल्याचं सांगितलं.
दीपिकाचे हे सेल्फी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
दीपिका सध्या कल्कि 2898 एडी चित्रपटामुळे आणि तिच्या प्रेग्नंसीमुळे प्रचंड चर्चेत आहे.