अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतेच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मितालीच्या बोल्ड आणि ब्यूटीफूल फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हाइट टॉप व पिंक स्कर्ट मध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. सॉफ्ट मेकअप आणि मोकळे केस ठेऊन तिने तिचा लुक पूर्ण केला आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही चांगलेच पसंतीस उतरले आहेत. मितालीने हे फोटोशूट ॲएमस्टरडॅम हॉलंड येथे केले आहे. चाहत्यांनी तिच्या पोस्टवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. मिताली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत पोस्ट करायला विसरत नाही. मितालीचे इंस्टाग्रामवर 724k फॉलोवर्स आहेत.