अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या यणाऱ्य 'उल्झ' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान तिने तिचा स्टाईलीस्ट लुक सादर केला आहे. जान्हवीने काळ्या रंगाची साडी आणि त्यावर कोरसेट घटलून एक वेगळी स्टाइल क्रिएट केली. फ्लोरल प्रिंटेड कोरसेट आणि साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती दोन्ही आऊटफीट्सवर खुलून दिसते. जान्हवी कपूरचा उल्झ चित्रपट 2 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘उलझ’ या चित्रपटासाठी उत्सुक आहे जान्हवी गुलशन देवैयासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. जान्हवी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असल्यामुळे तीच पोस्ट पाहायला मिळतात.