बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक सुपर डुपर फिल्म्स दिल्यात...
राजेश खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या तीन वर्षांत 15 सुपरहिट चित्रपट देऊन एक विक्रम रचलेला...
तेव्हापासून त्यांना बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हटलं जाऊ लागलं...
पण तुम्हाला माहीत आहे का? राजेश खन्ना यांना संपूर्ण इंडस्ट्री 'काका' म्हणून ओळखते.
त्यांना 'काका' का म्हटलं जायचं...? कधीपासून त्यांना हे नाव पडलं?
1971 मध्ये राजेश खन्ना यांचा एक चित्रपट आला होता, ज्याचं नाव 'आनंद'
'आनंद' सुपरडुपर हिट ठरल्यानंतर राजेश खन्ना यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता.
इंटरव्ह्यूमध्ये स्वतः राजेश खन्ना यांनी स्वतः काका शब्दाचा खुलासा केला होता.
त्यांनी सांगितलं होतं की, पंजाबमध्ये लहान मुलाला 'काका' म्हटलं जातं.
त्यामुळे त्यांना त्यांचे आई-वडील आणि त्यांचे नातेवाईक 'काका' म्हणायचे.
शाळा आणि कॉलेजमध्येही राजेश खन्ना यांना त्यांचे मित्र 'काका' म्हणायचे.
1966 मध्ये राजेश खन्ना यांनी आखरी खत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
हा चित्रपच रिलीज झाल्यानंतर त्यांचे मित्र आणि फॅन्सला काका नावाबाबत समजलं होतं.
तेव्हापासून सर्वजण त्यांना 'काका' म्हणू लागले...