भारताच्या स्वातंत्र लढ्यात आणि चळवळीमध्ये विदेशी कपड्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता आणि सर्व भारतीयांनी स्वदेशी कापड परिधान करण्याचे ठरवले होते.
खादी कपड्याचा रंग मुख्यत: पांढरा होता, त्यामुळे स्वातंत्रवीर आणि सर्व भारतीय पांढरे कपडे वापरू लागले.
पांढरा रंग हा सर्व धर्म आणि सर्व जातीच्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रतीक आहे. यातून शांती आणि एकात्मतेचा संदेश मिळतो.
पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक असून हा रंग पवित्र मानला जातो.
भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक विधीमध्ये पांढरा रंग परिधान करतात.
स्वातंत्रलढ्यात महात्मा गांधी यांनी पांढरा रंगाचे पोशाख घालण्याचे आवाहन केलं होतं. खादी हे केवळ स्वदेशीचं प्रतीक नसून त्यामुळे अनेक नागरिकांना रोजगार मिळतो.
महात्मा गांधीजींनी आव्हान केल्यानंतर भारतीयांनी त्यांना पाठिंबा दिला आणि इथून खादीचे कपडे वापरण्यास सुरुवात झाली.
कालांतराने पांढरा रंग हा राजकारणाशी संबंधित लोकांची ओळख बनला. आजही राजकारणी नेते मंडळी पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे घालतात.