कोल्डप्ले एक ब्रिटिश रॉक बैंड आहे. या बँडची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आली होती.
या बँडमध्ये एकूण ५ जण आहेत . ज्यामध्ये गायक आणि पियानोवादक क्रिस मार्टिन, गिटारवादक जॉनी बकलैंड, बासिस्ट गाय बेरीमॅन, डुमर आणि पर्क्युसिनिस्ट विल चॅम्पियन आणि मॅनेजर फिल हार्वे यांचा समावेश आहे.
यापैकी चौघे स्टेजवर परफॉर्म करताना पाहायला मिळतात.
या बँडचे जगभरात चाहते आहेत आणि यांच्या कुठल्याही कॉन्सर्टला तुफान गर्दी होते. 5. यांचा परफॉर्मन्स इतर रॉक बँडपेक्षा खूप वेगळा असतो. जगातील सध्याचा सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी बँड म्हणून कोल्डप्लेची ओळख आहे.
मनाला साद घालणाऱ्या संगिताचे जगभरात चाहते आहेत.
विषेश म्हणजे या रॉक बँडची सुरुवात कॉलेजच्या दिवसात सुरू केली होती आणि या बंडला यांच्या गाण्यांमुळे इतर अनेक पुरस्कारांसह संगीत श्रेत्रात मानाचा मानला जाणारा ग्रॅमी अवॉर्ड देखील त्याना मिळाला आहे.
युट्यूबवर यांच्या गाण्यांना कोटववधी व्यूज मिळाले आहेत.
फिक्स यू (Fix You) कोल्डप्ले बँडचे सर्वात प्रसिद्ध गाणे कोणते असे म्हटले तर सर्वांचे उत्तर फिक्स यू हेच असेल.
या गाण्याचे जगभरात चाहते आहेत. या गाण्याच्या ऑफिशीयल व्हिडीओला यूट्यूबवर ६५० मिलीयन व्ह्यूज आहेत. युट्यूबवर हे गाणे १३ वर्षापूर्वी अपलोड करण्यात आले होते.
क्लॉक्स (Clocks), व्हिवा ला व्हिडा (Viva La Vida), ट्रबल (Trouble)
येलो (Yellow), मॅजिक (Magic),
द साईटीस्ट (The Scientist), पॅराडाईज (Paradise), स्पीड ऑफ साऊंड (Speed of Sound), इन माय प्लेस (In My Place)