भिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले. फोटोंमध्ये मृणाल पारंपारिक पोशाखात दिसली. मृणालने हिरव्या रंगाचा 'चूडा'घातला आहे. तिने नाकात नथ घालून तिने लूक पूर्ण केला आहे. तिने 'सुपर ३०', 'बाटला हाऊस', 'धमाका', 'सीता रामम', 'पिप्पा', 'द फॅमिली स्टार' यांसारख्या अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये काम केले आहे. अलीकडेच तिने 'कल्की 2898 एडी' या साय-फाय थ्रिलरमध्ये दिव्याची भूमिका साकारली होती. मृणालचे इंस्टाग्राम वर 13.5 M फॉलोवर्स आहेत. मृणालने आपल्या मराठमोळ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे.