मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स या दोन जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा आहेत,

मिस वर्ल्ड

या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट ब्युटी विथ अ पर्पज आहे. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सामाजिक कार्यासाठीची बांधिलकी यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते.

स्पर्धकांना त्यांच्या सामाजिक कार्यांविषयी विचारले जाते आणि त्या आधारावर त्यांचे मूल्यांकन केले जाते.

सौंदर्य, बुद्धिमत्ता, प्रतिभा, क्रीडा कौशल्ये, मॉडेलिंग क्षमता आणि 'ब्युटी विथ अ पर्पज' प्रकल्पातील सहभाग यांसारख्या विविध घटकांवर आधारित मूल्यांकन केले जाते.

मिस युनिव्हर्स

सौंदर्य, आत्मविश्वास, स्टेज प्रेझेन्स मुलाखत आणि सामाजिक समस्यांवरील विचार यांवर अधिक लक्ष दिले जाते.

ही स्पर्धा 1952 मध्ये अमेरिकेतील पॅसिफिक मिल्स या कंपनीने सुरू केली. सध्या 'मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन' या संस्थेद्वारे याचे आयोजन केले जाते

ज्याचे मुख्यालय न्यूयॉर्क आणि बँकॉक येथे आहे.

दोन्ही स्पर्धा सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा सन्मान करतात.

मिस वर्ल्ड सामाजिक कार्यावर अधिक लक्ष केंद्रित करते, तर मिस युनिव्हर्स आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वावर अधिक भर देते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.