अभिनेत्री अभिज्ञा भावे ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिज्ञानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. सिलव्हर शिम्मरी ड्रेस लूकमधील फोटो अभिज्ञानं शेअर केले आहेत. तिचं हा लुक खूपच ग्लॅमरस आहे. अभिज्ञाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ यांसारख्या अनेक मालिकांमधून अभिज्ञा घराघरांत पोहोचली आहे आता तिने थेट हिंदी मालिका विश्वातही एन्ट्री केली आहे. अभिज्ञाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. अभिज्ञा ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते.