आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे, अशी भावना प्रत्येक पालकाची असते.
पालकांनी मुलांना चांगल्या गोष्टीची सवयी लावायला हवी.
पालकांनी आपल्या मुलांना मूलभूत सवयी शिकवाव्यात.
जर कोणी मदत केली तर धन्यवाद म्हणावे, असे पालकांनी आपल्या मुलांना शिकवणे गरजेचे आहे.
आपल्याकडून चूक झाली तर क्षमा मागावी आणि जर दुसऱ्याकडून चूक झाली, तर त्याला मोठ्या मनाने माफ करावे, हे मुलांना शिकवा.
मुलांना स्वछतेबद्दल शिकवावे आणि आनंदाने कसे राहावे, हे शिकवणे आवश्यक आहे.
मुले कोणत्याही गोष्टीचा दुरुपयोग करणार नाही आणि त्यांना निसर्गाचा आदर करायला शिकवा.
सर्वांचा आदर करावा आणि सर्वांसोबत प्रेमाने वागावे, ही शिकवण मुलांना द्या.
शिस्त आणि नियम हे सुद्धा पाळणे शिकवा.
वेळेचे महत्व आणि वेळेचा योग्य वापर करावा, हेसुद्धा मुलांना शिकवणे आवश्यक आहे.