तैमूर अली खान बॉलिवूडचा लोकप्रिय स्टार किड आहे.
आणि आता त्याचा धाकटा भाऊ जेह देखील सोशल मीडियावर छाप पाडत आहे.
त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.
करीना कपूर आणि सैफ अली खानची दोन्ही मुले तैमूर आणि जेह सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.
तैमूरचा जन्म झाल्यापासून सोशल मीडियात त्याचे फॉलोवर आहेत
आणि आता त्याचा भाऊ जेह देखील एक स्टार बनला आहे.
सैफ अली खान त्याच्या मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी घेऊन आला होता.
तैमूर आणि जेह फुटबॉल खेळण्यासाठी खूप उत्सुक होते.
फुटबॉल खेळण्यासाठी दोघांनी आपल्या आवडत्या प्लेअर्सचे कपडे घातले होते.
चाहते तैमूर आणि जेहला फुटबॉल खेळताना बघून जास्तीत जास्त कमेंट आणि लाइक्स करत आहेत.