यूट्युबर, प्रसिद्ध सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीचा (Prajakta Koli) चाहता वर्ग मोठा आहे. साध्या युट्यूब चॅनलपासून सुरुवात करुन आज तिने जगभरात नाम कमावलं आहे. प्राजक्ता तिच्या 'मोस्टली सेन' या चॅनलवर मनोरंजनात्मक व्हिडिओ पोस्ट करत असते. प्राजक्ताचा प्रवास तसा खूपच इंटरेस्टिंग आहे. तिने अगदी कमी वयात मोठं यश मिळवलंय. प्राजक्ता आत्ताच्या युवतीं साठी एक चांगल उदाहरण आहे आणि खूप जणांची चाहती आहे. प्राजक्ताच्या घरी दरवर्षी गौरी गणपती असतात. नेटकरी दरवर्षी तिच्या पोस्ट ची वाट बघत असतात. त्यामुळे या वर्षी परंपरेनुसार गौरींची पोस्ट टाकल्यावर तिच्या चहात्यांचा कंमेंट्स चा वर्षाव सुरु झाला आहे. छान अशी प्राजक्तच्या घरी गौरी आल्यावर प्राजक्ताने छानसे कॅप्शन टाकले आहे ,' गौरा बाई आयेली '.