दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर ही घराघरात प्रसिद्ध आहे.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
तिने आपल्या आई-बाबांच्या पावलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत पदार्पण केले.
एकुलती एक या मराठी चित्रपटातून ती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली.
त्यानंतर ती मराठी, हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध कलाकृतींमध्ये झळकली. ‘
‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमुळे घराघरात पोहोचलेली.
दरम्यान सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रियाचा जन्म 25 एप्रिल 1989 मध्ये झाला. 'तू तू मै मे' या हिंदी मालिकेतून बालकलाकर म्हणून ती झळकली
त्यावेळी ती अवघ्या 5 वर्षांची होती. त्यानंतर तिने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एकुलती एक' या चित्रपटात काम केले. यानंतर तिने शाहरुख खानच्या 'फॅन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर श्रिया 'मिर्झापूर', 'गिल्टी माईंड्स', 'द ब्रोकन न्यूज', 'ताजा खबर' यांसारख्या वेबसीरिजमध्ये झळकली. सध्या ती 'ब्रोकन न्यूज 2' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
श्रियाने नुकताच तिचा एक नवा लूक शेअर केलाय, ज्यात ती एका कलरफुल ड्रेसमध्ये दिसत आहे.
श्रियाचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.