बिग बॉस हिंदीचा १४ वा सीझन जिंकल्यानंतर रुबिनाने भरपूर लोकप्रियता मिळवली.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका छोटी बहूमध्ये राधिकाची भूमिका साकारून अभिनेत्री रुबिना दिलैकने घराघरात आपले नाव निर्माण केले होते.

रुबिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि आपले फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

याशिवाय गेल्या वर्षी रुबिनाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्याने ती सध्या त्यांचे पालनपोषण करण्यातही व्यस्त आहे.

रुबिना खऱ्या आयुष्यातही तितकीच सुंदर आहे जितकी ती पडद्यावर दिसते

रुबिनाने नुकतेच लाल रंगाच्या ब्लेझरमधले काही फोटो शेअर केले आहेत.

या सोबत तिने बन हेअरस्टाईल केली आहे.

तिचा हा लूक सध्या व्हायरल होतोय. अभिनेत्री रुबीना दिलैक हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.

रुबीना दिलैक हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.