अभिनेत्री तमन्ना भाटिया म्हणजे सौंदर्याची खाण... असं देखील म्हटलं जातं.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
तमन्ना तिच्या कामामुळे कमी पण सौंदर्यामुळे अधिक चर्चेत असते.
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.
देसी लूकमध्ये फोटोशूट करत तमन्ना हिने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तमन्ना भाटिया हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
तमन्ना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.
तमन्ना भाटिया सध्या तिच्या 'ओडेला 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्याबद्दल तिचे चाहतेही खूप उत्सुक आहेत.
तमन्नाच्या आगामी 'ओडेला 2' सिनेमा हा थ्रिलर चित्रपट आहे. जो अशोक तेजा दिग्दर्शित करत आहे.
या चित्रपटात ती शिवशक्ती नावाच्या महिलेची भूमिका साकारत आहे, जी भगवान शिवाची भक्त आहे आणि वाईट शक्तींशी लढण्यासाठी एका भयानक गावात येते. या चित्रपटात वसिष्ठ एन. सिम्हा खलनायकाची भूमिका साकारत आहेत.