बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण
आणि रणवीर सिंह सध्या चर्चेत आहेत.
दीपिकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
दीपिका आणि रणवीर लवकरच आई-बाबा होणार आहेत.
दीपिकाचे बेबी बंप पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अशातच आता दीपिका आणि रणवीरमध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.
अभिनेत्याच्या एका कृतीने त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
अभिनेत्याने लग्नाचे फोटो सोशल मीडियावरुन हटवले आहेत.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.
रणवीर-दीपिका यांचं बिनसलं असल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत.
दीपवीरने वेळोवेळी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.