टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. (Photo credit : Instagram/@prathameshparab) नुकतेच प्रथमेशने हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@miles_in_style) या फोटोंमध्ये प्रथमेश हळदीची मज्जा घेताना पाहायला मिळत आहे. (Photo credit : Instagram/@prathameshparab) दुसरीकडे क्षितीजाचा मेहंदी सोहळा देखील पार पडला आहे. (Photo credit : Instagram/@miles_in_style) क्षितीजाने तिच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेहंदी काढली आहे. (Photo credit : Instagram/@prathameshparab) क्षितीजाच्या मेहंदीवर #pratija असे नाव लिहिलं आहे. (Photo credit : Instagram/@prathameshparab) क्षितीजाने मेहंदीसाठी खास लूक केला होता. (Photo credit : Instagram/@miles_in_style) क्षितीजाने #pratija असे नाव लिहिलेला हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (Photo credit : Instagram/@miles_in_style) विशेष म्हणजे क्षितीजाने 'प्रथमेश ची पराजू' असं लिहिलेले सुंदर कानातले देखील घातले होते. (Photo credit : Instagram/@miles_in_style) आता त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून 24 फेब्रुवारी रोजी ते लग्नबंधनात अडकणार आहेत. (Photo credit : Instagram/@miles_in_style)