दीपिकाने यल्लो कलरच्या स्ट्रेपी ड्रेसमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट केला.
प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच दीपिकाने बेबी बम्प फ्लॉन्ट केला.
अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो झळकत आहे.
तिच्या स्मित हास्याने चाहते घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिकाने सिंपल पण किलर पोझ दिली आहे.
दीपिकाच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आल्यानंतर 'दीपवीर'च्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता.
दीपिका सप्टेंबर महिन्यात आई होणे अपेक्षित आहे.
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने सोशल मीडियातून आपण आई-बाबा होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली.
मुंबईत मतदानाच्या दिवशी दीपिका आणि रणवीर सिंह एकत्र दिसले.
त्यावेळी दीपिकाचा बेबी बम्प दिसून आला. दीपिकाचे फोटो,
व्हिडीओ पाहून काहींनी ट्रोल करणाऱ्या कमेंट्स केल्या.
सोशल मीडियावर काही ट्रोलर्सने दीपिकाच्या गरोदरपणावर प्रश्न उपस्थित केले होते.
एका युजरने दीपिका प्रेग्नेंट नसल्याचे म्हटले.
तर, एकाने दीपिकाचे बेबी बम्प अजून दिसत नाही, तरी ती अशी का चालतेय असा प्रश्न केला.