सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वात अप्सरा आली या गाण्याने अधिक ओळख मिळवली. सोनाली सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. नुकतंच तिने अंगारो सा या गाण्यावर हटके डान्स करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. सोनालीने आकाशी रंगाच्या स्लिट गाऊनवर हटके फोटोशूट केले आहे. तिचा हा लुक चाहत्यांना घायळ करणारा आहे. पण सोबतच तिने सतत ट्रोल करणाऱ्या लोकांना फोटोच्या कॅप्शन मार्फत सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने आपल्या कॅप्शनमध्ये असे म्हंटले की, त्या सर्व महिलांसाठी ज्यांना त्यांच्या शरिराच्या आकारामुळे ट्रोल करण्यात आले.