मॅडम एस ( madame S ) नावाने Merchandise ब्रँड केला लाँच !
काही दिवसापासून सई तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मधून वेगवेगळ्या शब्दाची पोस्ट शेअर करत होती.
यातून नक्कीच ती काहीतरी खास करणार असल्याची झलक ती प्रेक्षकांना Instagram पोस्ट मार्फत मिळाली होती.
आणि आज सई ने वाढदिवसानिमित्त स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे !
2024 वर्ष सई साठी अगदीच खास आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही.
बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि धमाकेदार काम करून सई चर्चेत असते.
आणि आता तिची एक खास गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते ही गोष्ट नक्की काय ? या मागची गोष्ट काय हे सगळं सई सांगतेय !
स्वतःच्या वाढिवसानिमित्त मॅडम एस ( madame S ) हा Merchandise ब्रँड लाँच केला असून अगदीच हटके अस या ब्रँडच नाव आहे.
आणि त्याची गोष्ट देखील तितकीच भारी आहे. क्वीन ऑफ स्यासी ट्यूड “ असा याचा अर्थ आहे.
बॉलिवुडला सईच्या अभिनयाची पडलेली भुरळ, आता नवा कोरा ब्रँड या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत येईल यात शंका नाही.