नुकताच प्रदिर्शित झालेला चित्रपट 'इश्क विश्क रिबाऊंड' हा प्रेक्षकांच्या पसंतीस येतोय.
या चित्रपटातील एक चॉकलेट बॉय हिरो म्हणजेच रोहित सराफ.
वयाच्या अवघ्या 15 वर्षांपासून रोहितने अभिनयाला सुरुवात केली.
रोहित हा फक्त त्याच्या अॅक्टिंगमुळेच नाही तर त्याच्या उत्तम फॅशन सेन्समुळेही चाहत्यांना भुरळ घालतो.
त्याचं स्टाईल स्टेटमेंट आजच्या तरूण पिढीला आकर्षित करणारं आहे.
2012 मध्ये चॅनल V वरील Best Friends Forever या मालिकेत त्याने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं.
त्यानंतर 'मिस मॅच' या सीरिजसाठी देखील तो फार फेमस झाला.
रोहित त्याचे फोटो नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
तसेच, सोशल मीडियावरही तो बराच अॅक्टिव्ह आहे.
रोहितचा फिमेल फॅनबेस प्रचंड आहे.