भाग्यश्री मोटेचं ठरलेलं मोडलं...
भाग्यश्री मोटेचं लग्नाआधीच घुमजाव!
तिने सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन साखरपुडा मोडला असल्याची माहिती दिली आहे.
भाग्यश्री ही मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत लग्न करणार होती.
2022 मध्ये या जोडप्याने साखरपुडा देखील उरकला होता.
पण आता या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिचा साखरपुडा मोडला असल्याचं जाहीर केलंय.
त्याचप्रमाणे यावेळी तिने त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये स्पेस देण्याचीही विनंती यावेळी केलीये.
भाग्यश्री आणि विजयच्या साखरपुड्याला हृतिकनेही हजेरी लावली होती.
कारण विजय हा हृतिकचा मेकअप आर्टिस्ट आहे.
मराठी मालिकाविश्वात अभिनयाची छाप सोडल्यानंतर भाग्यश्रीने काय रे रास्कला या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
यानंतर तिने माझ्या बायकोचा प्रियकर, काय रे रास्कला या चित्रपटातही काम केलं.