सध्या सगळीकडे ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.

लग्नाच्या 18 वर्षानंतर ऐश्वर्याने नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

पण ऐश्वर्याने हा निर्णय का घेतला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष यांनी सहमतीने चेन्नईच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान जेव्हा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या, त्यावेळी त्यांच्या घटस्फोटाचं कारण समोर आलं होतं.

या जोडप्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीने याविषयी भाष्य केलं होतं.

असं सांगण्यात आलं होतं की, धनुष हा त्याच्या कामाला नेहमीच जास्त महत्त्व देतो. त्याचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावरही होत होता.

त्याला कामासमोर त्याचं कुटुंबही दिसत नव्हतं.

त्यामुळे त्या दोघांच्या अनेकदा वाद झाले आणि 2022 मध्ये या जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.