अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या विजयी उमेदवार
कंगना रणौतच्या कानशिलात लगावली असल्याची माहिती समोर आली आहे.
चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कानशिलात लगावली
असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला आहे.
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक
जिंकल्यानंतर कंगना रणौत आज दिल्लीला रवाना झाली.
त्या दरम्यान ती चंदिगड विमानतळावर असताना तिला सीआयएसएफच्या
महिला जवानाने मारहाण केली असल्याचे आरोप कंगनाने केला आहे.
दिल्ली विमानतळावर पोहचलेल्या कंगना रणौतला पापाराझींनी या घटनेबाबत विचारण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर कंगनाने कोणतेही भाष्य केले नाही